दारू दुकान हटविण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:41 AM2021-01-25T04:41:21+5:302021-01-25T04:41:21+5:30
कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या समोर देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान शाळेपासून नियमापेक्षा कमी अंतरावर असल्याने, ते ...
कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या समोर देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान शाळेपासून नियमापेक्षा कमी अंतरावर असल्याने, ते हटविण्यासाठी यापूर्वी महिलांनी आमरण उपोषण केले. त्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदागवळी यांनीही उपोषण केले, परंतु देशी दारू दुकान काही हटले नाही. त्यामुळे आता येत्या २५ जानेवारीपासून हे दुकान हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी जि.प. विद्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, परंतु हे उपोषण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इंगळे यांनी यापूर्वीही चार वेळा निवेदन देऊन देशी दारू दुकान न हटविल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता, परंतु ११ ऑगष्ट रोजी कारंजा तहसीलदारांनी त्यांना १५ ते २० दिवसांत देशी दारू दुकान हटविण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले होते.