अवैध गौण खनिज प्रकरणी १२ लाखाचा दंड वसूल

By admin | Published: December 24, 2014 12:34 AM2014-12-24T00:34:42+5:302014-12-24T00:34:42+5:30

कारंजा लाड तालुक्यातील प्रकार; महसुल विभागाची कारवाई.

Illegal mineral wealth recovered a fine of 12 lakhs | अवैध गौण खनिज प्रकरणी १२ लाखाचा दंड वसूल

अवैध गौण खनिज प्रकरणी १२ लाखाचा दंड वसूल

Next

प्रफुल बानगावकर /कारंजा लाड (वाशिम): इ-क्लास जमिनीवरील गौण खनिजाचे उत्खनन करून वापरासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे गेल्या दोन वर्षात अवैध गौण खनिजाच्या चोरीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन वर्षात १३१ वाहन चालकांना अवैध गौण खनिज चोरी करताना रंगेहाथ पकडून संबंधित मालकाविरूद्ध १२ लाख ६८१४0 रूपये दंड आकारून कारवाई केली.
इ-क्लास जमिनीवरील रेती, मुरूम, गिट्टी, माती आदी विविध प्रकारचे गौण खनिज वापरण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे तालुक्यात गौण खनिजाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात रेतीचे आठ घाट आहे. मात्र शासनाने परवानगी न दिल्यामुळे त्या घाटातील रेती अप्रत्यक्षरित्या बांधकाम करणार्‍या ठेकेदारांनी तसेच घरगुती बांधकाम करणार्‍यांनी या घाटातून चोरी केल्यामुळे आज रोजी या घाटात खड्डे निर्माण झाले आहे. तसेच कोळी, वालई, खेर्डा, कारंजा या परिसरातून मुरूमाची मोठय़ा प्रमाणात गौण खनिजाची चोरी होते. त्या गौण खनिज चोरणार्‍याविरूद्ध महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या अंगावर वाहन नेवून त्यांना मारण्याची धमकी देण्याचा प्रकार तालुक्यात गेल्या दोन वर्षात पहायला मिळाला. त्यामुळे एकटा कर्मचारी कारवाई करण्यास पुढे येत नाही.
मात्र उपविभागीय अधिकारी दिनकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने २0१३ या वर्षात अवैध गौण खनिजाच्या चोरीचे प्रकरणे उघडकीस आणुन १0१ वाहनाविरूद्ध कारवाई केली व ९ लाख दंड वसुल केला. २0१४ या वर्षात ३१ वाहनधारकाविरूद्ध ३६८१४0 हजार रूपये दंड असे एकूण १३१ वाहनधारकाविरूद्ध गौण खनिजाची चोरी करणार्‍या संबंधिताविरूद्ध १२६८१४0 रूपये दंड करून कारवाई केल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली.

Web Title: Illegal mineral wealth recovered a fine of 12 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.