दापुरा प्रकल्पावर सिंचनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:53+5:302021-01-08T06:11:53+5:30
^^^^^^^^^ उंबर्डा बाजार येथील हातपंप बंद उंबर्डा बाजार: येथील बसस्थानक परिसरातील हातपंप मागील ब-याच दिवसांपासून बंद आहे. या हातपंपाचा ...
^^^^^^^^^
उंबर्डा बाजार येथील हातपंप बंद
उंबर्डा बाजार: येथील बसस्थानक परिसरातील हातपंप मागील ब-याच दिवसांपासून बंद आहे. या हातपंपाचा परिसरातील ग्रामस्थांना आधार आहे, शिवाय येणा-या जाणा-या वाटसरू या हातपंपावर पाणी पितात. त्यामुळे हा हातपंप दुरुस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे गुरुवारी केली.
-------------------
शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा
दापुरा: गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद, मूग पिकाचे अतोनात नुकसान झाले. याबाबत शासनाने मदत मंजूर केली तरी पानगव्हाण येथील शेतक-यांना ती मिळाली नसल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली. आता शासनाने अनुदान मंजूर केल्याने तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.
--------------
पाणंद रस्त्याचे काम रखडलेलेच
लोहगाव: परिसरातील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळून कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी सरपंचांकडे गुरुवारी केली.
---------
आरोग्य केंद्रातंर्गत तपासणी शिबिर
धामणी खडी: येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने परिसरातील गावांत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली आहे. या अंतर्गत बुधवारपर्यंत २०० पेक्षा अधिक ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली असून, यातील अनेकांवर उपचार करून त्यांना औषधींचे वितरणही करण्यात आले आहे.
----------------
रस्त्यालगत अतिक्रमण
आसोला खु.: गावातील रस्त्यालगत लघू व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. यातून अपघात घडण्याची भीती असल्याने हे अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी बुधवारी ग्रामपंचायतकडे केली आहे. याची दखल तातडीने घेण्याची मागणी होत आहे.
===Photopath===
070121\07wsm_5_07012021_35.jpg
===Caption===
दापुरा प्रकल्पावर सिंचनात वाढ