नाफेडद्वारा तूर खरेदीची मयार्दा वाढवून द्या ! - शिव संग्राम संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:16 PM2018-03-01T15:16:46+5:302018-03-01T15:16:46+5:30
वाशिम : नाफेडद्वारे तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी व हरबरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे यासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पणन मंत्री सुभाषराव देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
वाशिम : नाफेडद्वारे तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी व हरबरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे यासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पणन मंत्री सुभाषराव देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
२०१७ मध्ये अपेक्षीत पाऊस पडला नसल्याने शेतकºयांना समाधानकारक उत्पादन घेता आले नाही. पावसाने सरासरीदेखील गाठली नव्हती. उत्पादनात घट आणि शेतमालाच्या किंमतीतील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. आताही बाजार समित्यांमध्ये तूरीला हमीभाव मिळत नाही. हमीभावाने खरेदी व्हावी यासाठी नाफेड खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र या केद्रामध्ये एकरी एक क्विंटल साठ किलोची मर्यादा घालून देण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे उत्पादन यापेक्षा जास्त पटीने झाले आहे. त्यामुळे ही मर्यादा किमान एकरी ५ क्विंटल तरी करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व केंद्रावरील माल खरेदीचा वेग वाढवावा, हरभº्याची खरेदी तात्काळ सुरु करावी या व इतर मागण्यांसाठी शिव संग्राम संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, जिल्हा उपाध्यक्ष रवीभाऊ चोपडे, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, रामेश्वर अवचार, संतोष सुर्वे, शिरूभाऊ नागरे, घनश्याम मापारी, जगन पाटील अवचार, महादेव जाधव यांची उपस्थिती होती.