जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर या निवडणुकीत ४२४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ८९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले, तर ९६२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ३१८२ उमेदवार उरले आहेत. तथापि, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणा-या ४२४२ उमेदवारांना त्यांच्याकडील थकीत कराचा भरणा करणे आवश्यक होते. त्यामुुळेच ग्रामपंचायतीच्या थकीत करवसुलीस मोठा आधार मिळाला. डिसेंबर महिनाअखेर वाशिम जिल्ह्यात विशेष पाणीपट्टी आणि इतर कर मिळून सात कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचा कर वसूल होऊ शकला. पाणीपट्टीच्या वसुलीत थकीत आणि चालू कर मिळून वसुलीचे प्रमाण ३२ टक्के, तर इतर प्रकारात थकीत आणि चालू करवसुलीचे प्रमाण ४७.५० टक्के झाले आहे.
-----------
२५ वर्षांपूर्वीच्या थकीत कराचाही भरणा
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमधील १४८७ प्रभागांच्या निवडणुकीत यंदा ४२४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात यंदा प्रथमच नव्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उमेदवारांना त्यांच्याकडील थकीत कराचा भरणा करणे आवश्यक असल्याने तब्ब्ल २५ वर्षांपूर्वी थकीत असलेला करही या अनुषंगाने वसूल होऊ शकला आहे. आता या करवसुलीतून गावातील विकासकामांचे नियोजन करणेही ग्रामपंचायतींना शक्य होणार आहे.
------------------
ग्रामपंचायतीची करवसुली
कराचा प्रकार मागणी वसुली
मालमत्ताकर १२७५.०३ ४७८.१४
दिवाबत्तीकर ७४.८५ २८.०७
आरोग्यरक्षणकर ७५.६० २८.३५
सामान्य पाणीपट्टी १३०.५१ ४८.९४
विशेष पाणीपट्टी ६११.१० १९५.५५
----------------------------------
एकूण २१७६.९९ ७७९.०५