औद्योगिक वसाहतींना मूलभूत सुविधांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:41 AM2017-10-30T00:41:15+5:302017-10-30T00:41:40+5:30

वाशिम : जिल्हा उपनिबंधक कार्यालय व सहकार भारतीच्यावतीने ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सहकार परिषदेचे आयोजन केले असून, राज्यभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

Industrial settlements await basic amenities! | औद्योगिक वसाहतींना मूलभूत सुविधांची प्रतीक्षा!

औद्योगिक वसाहतींना मूलभूत सुविधांची प्रतीक्षा!

Next
ठळक मुद्देआज सहकार परिषद परिषदेत मूलभूत सुविधांवर चर्चा होण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा उपनिबंधक कार्यालय व सहकार भारतीच्यावतीने ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सहकार परिषदेचे आयोजन केले असून, राज्यभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’तील असुविधा आणि उद्योगांची वानवा या विषयावरही मंथन व्हावे, अशी अपेक्षा लघू उद्योजक बाळगून आहेत.
सहकार परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे मुंबईचे अध्यक्ष काका कोयटे, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. वाशिम जिल्ह्यात सहकार चळवळ रुजविण्यासाठी तसेच नवनवे उद्योग उभे राहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) विकास होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीतील असुविधांवर नजर टाकली, तर कोणताही उद्योजक येथे उद्योग उभारण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येते. वाशिम जिल्हा निर्मितीनंतर अथवा  त्यापूर्वीही  या भागात काही अपवाद वगळता मोठे उद्योगच उभे राहू शकले नाहीत. सहकार तत्त्वावर उभे झालेले उद्योग नियोजनाचा  अभाव व अन्य बाबींमुळे  व्यवस्थित चालू शकले नाहीत. बोटावर मोजण्याइतकेच खासगी मोठे उद्योग  आजघडीला सुरू आहेत. छोट्या उद्योगाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. परिणामी, जिल्हा औद्योगिक क्षेत्रात प्रचंड  माघारला असल्याचे दिसून येते. वाशिम, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव येथील औद्योगिक क्षेत्रात अद्याप मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नसल्याचे दिसून येते. वाशिम शहरापासून  चार किलोमीटर  अंतरावर शासनाने औद्योगिक विकास क्षेत्राला मान्यता दिली. यासाठी २१९.१३ हेक्टर  क्षेत्र ताब्यात  घेतले आहे. या परिसरात पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. दळणवळणाची सुविधा नसल्याने मोठे उद्योजक वाशिममध्ये येण्यास धजावत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. मालेगाव तालुक्यासाठी एमआयडीसी क्षेत्र म्हणून अकोला ते वाशिम राज्य महामार्गावर मालेगाव शहरापासून  चार किमी अंतरावर असलेल्या अमानी येथे शासनाने लघू औद्योगिक क्षेत्रासाठी २0.८0 हेक्टर जमीन संपादित केली आहे. येथे एमआयडीसीचा सर्वांगीण विकास  झाल्यास गोडंबीचा मोठा व्यवसाय जिल्ह्यात उभा राहू शकतो. मंगरूळपीर व मानोरा येथील एमआयडीसी क्षेत्रातदेखील मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी, जिल्ह्यात एक-दोन अपवाद वगळता मोठ-मोठे उद्योग अद्याप उभे राहू शकले नाहीत.

Web Title: Industrial settlements await basic amenities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.