लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा - मानोरा तालुक्यात कापूस पिकावर 'मर' या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मानोरा तालुक्यात कपाशीचे पीक घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या पिकाची स्थिती चांगली व टवटवीत होती. ती आता पार बदलून गेली आहे. पात्या, फुले व बोंडाने गजबजलेले कपाशीचे झाड हिरवेगार दिसत होते. आता त्या झाडांची अवस्थाच बदलून गेली असून सुकल्यागत झाडे झाल्याचे दिसून येते. अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असून आता कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. अशा बिकट परिस्थितीत कापूस पीक कसे वाचवावे अशी गंभीर समस्या समोर उभी ठाकली आहे. ‘मर' या रोगाचे प्रमाण कापसाच्या विविध जातींपैकी एका विशिष्ट बियान्यांवरच जास्त असल्याचे सांगितले जात आहे. एकाएकी आलेल्या 'मर' या रोगावर नियंत्रण कसे मिळवावे या चिंतेने शेतकºयांची झोप उडाली आहे. शेतकºयांचा ‘कृषिमित्र’ म्हणून ओळख असलेले कृषी सेवा केंद्रांचे चालक जे औषध, किटकनाशक देतील, त्याच किटकनाशकाची फवारणी करण्याला शेतकरी प्राधान्य देतात. कृषी विभागाच्या चमूने शेतकºयांच्या बांधावर पोहचून योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षीत आहे.
मानोरा तालुक्यात कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:22 PM