सोयाबीन पीक प्रात्यक्षिकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:38+5:302021-07-29T04:41:38+5:30
कृषी विज्ञान केंद्र वाशिमचे कृषी विद्यातज्ज्ञ टी. एस. देशमुख व सरपंच लक्ष्मण जाधव यांनी सोयाबीन पीक प्रात्यक्षिकास भेट दिली. ...
कृषी विज्ञान केंद्र वाशिमचे कृषी विद्यातज्ज्ञ टी. एस. देशमुख व सरपंच लक्ष्मण जाधव यांनी सोयाबीन पीक प्रात्यक्षिकास भेट दिली. वाघमारे, गजानन जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सोयाबीन पीक कीड व रोग व्यवस्थापनाच्याबद्दल शेतकऱ्यांच्या शंकांचे टी. एस. देशमुख यांनी निरसन केले. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात निरीक्षण करून खोडमाशी व चक्रिभूंगा प्रादुर्भावामुळे वरील पाने कोमेजून माना टाकणे, पानाच्या कडा वाळणे, पानाच्या देठावर कंकणाकृती दोन वेटोळे निर्माण होऊन फांदी वाळणे अशी लक्षणे आढळल्यास खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला. फुलोऱ्याच्या तसेच कोवळी शेंग भरण्याच्या अवस्थेत होणारे नुकसान टाळण्यासाठी कीड व्यवस्थापनासाठी कीडग्रस्त फांद्या देठ खुडून नष्ट कराव्या, कीडनाशक मात्रा तीन पट वापरावी, कीडनाशक पंप वापरापूर्व धुवून घ्यावा तसेच फवारणी करताना शिफारस नसलेले रासायनिक मिश्रण करणे टाळावे, सुरक्षा वस्त्र, चष्मा, मास्क आदी साधनांचा वापर करावा. सोयाबीन पीक फुलोरा काळात पिकातील डवरणी, आंतर मशागत, तणनाशक वापर टाळावा,असा सल्ला मान्यवरांनी दिला.