- प्रफुल बानगांवकर कारंजा लाड (वाशिम): महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली. नरेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मात्र केवळ ९ हजार कोटी खर्चुन १७ हजार गावात जलयुक्त शिवार च्या माध्यमातून प्रत्येक शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोचविण्यात आले, असेही शााह यांनी सांगितले.कांरजा येथे आयोजीत विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रसरकाच्या ३७० कलम रद्द करण्याच्या निणयार्चे समर्थन केले. ते म्हणले गेल्या 70 वर्षात देशातील एकाही पतप्रंधानाना ३७० कलम हटविण्याचे धाडस करता आले नाही. प्रतप्रंधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपल्या शासनाच्या दुसर-या टर्म मधील पहील्याच सत्रात हे कलम रद्द्् करून काश्मिरला भारतात विलीन केले. काश्मिर हे भारताचा अविभाज्य घटक असल्याने या मुद्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही शाह यांनी ठणकावून सांगितले. भाजप सरकार २०२४ पूर्वी भारतातल्या कानाकोपऱ्यात दडून बसलेल्या घुसखोरांना बाहेर काढून मारेल, असा इशाराही शाह यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र अनेक क्षेत्रात पहील्या क्रमांकावरून १५ व्या क्रमांकाच्या खाली फेकल्या गेला अशी टीका करताना, शाह म्हणाले की, आघाडीच्या काळात दर दोन किंवा तिन वषार्नी मुख्यमंत्री बदलले जायचे. त्यामुळे स्थिर सकरार नव्हते आणि म्हणुनच विकासही रखडला होता. आम्ही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ५ वर्ष एकच मुख्यमंत्री कायम ठेवला. त्यांच्या काळात विदर्भातील १६ 6 लाख शेतकऱ्यांना ८ कोटीची कर्जमाफी मिळाली. फडणविस सरकारने समृद्धी महामागार्साठी ५५ हजार कोटी रूपयाचा निधी दिला, असेही अमित शाह म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटी खर्चुनही सिंचन वाढले नाही - अमित शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 4:17 PM