लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत प्रलंबित अर्थसहाय्य, पीककर्ज देण्यास टाळाटाळ, आधार केंद्रांचा अभाव, विविध दाखल्यांसाठी सेतू केंद्रांवर लुट आदी शेतकºयांच्या प्रश्नावरून माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांशी चर्चा केली. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसिलदार आर.यू. सुरडकर यांना केल्या.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत बºयाच शेतकºयांना प्रथम हप्ता मिळाला नाही, तालुक्यात आधार केंद्र सुरू करणे, सेतू केंद्रांवर विविध दाखल्यासाठी जादा फी आकारणे, पिक कर्ज मिळवण्यासाठी बँक कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत अशा समस्या शेतकºयांनी मांडल्या होत्या. या पृष्ठभूमीवर शिपिंग कॉपोर्रेशन आॅफ इंडियाचे संचालक तथा माजी आमदार विजयराव जाधव यांनी तहसील कार्यालय येथे तहसीलदार आर. यु. सुरडकर यांच्याशी चर्चा केली. सुरडकर यांनी सांगितले की २५ तारखेपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ज्या शेतकºयांना प्रथम हप्ता मिळाला नाही, त्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात येतील. यामध्ये काही त्रुटी असल्यास माझ्याकडे अर्ज करावे. तालुक्यात चार आधार केंद्राची मागणी केली असून लवकरच आधार केंद्र मिळतील. सेतू केंद्रांमध्ये विविध दाखले यासंबंधी फीचा तक्ता आहे. ग्राहकाने तेवढीच फी देऊन पावती घ्यावी. ज्यादा पैसे घेतल्यास तक्रार करावी, तातडीने संबंधित सेतू केंद्र व्यवस्थापकावर कारवाई करू, अशी ग्वाही सुरडकर यांनी दिली. यावेळी विजयराव जाधव यांच्यासोबत तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख, अमोल नरवाडे, जयंत वसमतकर, संतोष मवाळ, विष्णू खाडे , श्रीकांत संत, दिगंबर जाधव, सुनील धूत, गोपाल जाधव, दीपक गिराम, मोहन शिंदे, केशव बाजड, रणजीत साबळे, भारत गुंजकर, प्रशिक जुमडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार धडकले रिसोड तहसिल कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:51 PM