काजळेश्वर ग्रामपंचायतची मुदत संपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:46+5:302021-01-08T06:11:46+5:30
राज्य निवडणूक आयोगाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित ठेवताना त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले होते. ...
राज्य निवडणूक आयोगाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित ठेवताना त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले होते. त्यानंतर मात्र एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. आता जानेवारी महिन्यात काही ग्रामपंचायतींची मुदत संपत असून, यात कारंजा तालुक्यातील काजळेश्वर ग्रामपंचायतची मुदत ४ जानेवारी २०२१ रोजी संपली. तथापि, अद्यापही या ठिकाणी प्रशासनाने प्रशासक नियुक्त केला नाही किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती केली जाते की पुढील काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसोबत काजळेश्वर ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.