चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा दहा दिवसांत शोध घेण्यात कारंजा पोलिसांना यश; एका आरोपीसह ट्रॅक्टर ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:56 PM2018-01-11T13:56:44+5:302018-01-11T13:58:26+5:30

कारंजा लाड:  शहरातील एका पेट्रोल पंपसमोरून ३० डिसेंबर रोजी लंपास केलेल्या ट्रॅक्टरचा शोध लावण्यात कारंजा शहर पोलिसांना यश आले आहे.

karanja police success in tracing the stolen tractor in ten days | चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा दहा दिवसांत शोध घेण्यात कारंजा पोलिसांना यश; एका आरोपीसह ट्रॅक्टर ताब्यात 

चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा दहा दिवसांत शोध घेण्यात कारंजा पोलिसांना यश; एका आरोपीसह ट्रॅक्टर ताब्यात 

Next
ठळक मुद्देशहरातील एका पेट्रोल पंपसमोरून ३० डिसेंबर रोजी लंपास केलेल्या ट्रॅक्टरचा शोध लावण्यात कारंजा शहर पोलिसांना यश आले आहे. ट्रॅक्टरसह एका चोरट्याला मानोरा तालुक्यातील कुपटा येथून १० जानेवारी रोजी अटक केली.  पोलिसांनी तपास चक्र फिरवीत सदर ट्रॅक्टर ३१ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून जप्त केला.

कारंजा लाड:  शहरातील एका पेट्रोल पंपसमोरून ३० डिसेंबर रोजी लंपास केलेल्या ट्रॅक्टरचा शोध लावण्यात कारंजा शहर पोलिसांना यश आले आहे. अवघ्या १० दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ट्रॅक्टरसह एका चोरट्याला मानोरा तालुक्यातील कुपटा येथून १० जानेवारी रोजी अटक केली. 

तालुक्यातील ग्राम बेलमंडळ येथील प्रविण वासनिक यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी एम.एच.३७- एम-५४२९ क्रमांकाचा  ट्रॅक्टर ३० डिंसेबर रोजी शहरातील एका पेट्रोल पंपासमोर उभा ठेवला होता.  ट्रॅक्टर चालक प्रविण वासनिक हे फराळ करण्यासाठी नजिकच्या हॉटेलवर गेले असता अज्ञात चोरटयांनी त्यांचा पाच लाख रुपये किंमतीचा हा ट्रॅक्टर लंपास केला. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलीसांनी अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर कारंजा शहर पोलीसचे ठाणेदार बोडखे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपास चक्र फिरवीत सदर ट्रॅक्टर ३१ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून जप्त केला; परंतु हा ट्रॅक्टर पळविणारे चोरटे फरार झाले होते. सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पायघन व धनराज पवार, विनोद महाकाळ, फिरोज खॉन, विनोद राठोड यांनी तपास करून १० जानेवारी रोजी या चोरट्यांपैकी शेख मंजुर शेख फरीद (३९) रा कुपटा ता. मानोरा याला अटक केली. पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे.  

Web Title: karanja police success in tracing the stolen tractor in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.