हळद विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:32+5:302021-07-29T04:41:32+5:30

००००००००० रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव वाशिम : किन्हीराजा, भर जहागीर, तामशी, उकळीपेन जिल्हा परिषद गटातील अनेक रेशन दुकानांमध्ये ...

Lack of market for sale of turmeric | हळद विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव

हळद विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव

googlenewsNext

०००००००००

रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव

वाशिम : किन्हीराजा, भर जहागीर, तामशी, उकळीपेन जिल्हा परिषद गटातील अनेक रेशन दुकानांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात आले नाही, तसेच तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी बुधवारी केली.

०००००

२०० मीटर अंतराच्या नियमाची पायमल्ली

वाशिम : वाशिम, रिसोड, मालेगाव शहरातील बस स्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत खासगी वाहने उभी राहू नयेत, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र या नियमाची पायमल्ली केली जात आहे. नो पार्किंग झोनमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी राहतात.

००००

धोकादायक पुलाच्या दुरुस्तीची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी या गावावरून मेडशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीवर असलेला पूल धोकादायक अवस्थेत आहे. सुरक्षा कठडे तुटल्यामुळे अपघात हाेऊ शकताे.

०००००००००

खासगी वाहनाचे प्रवासी भाडे महागले

वाशिम : खासगी प्रवासी वाहनाचे भाडेही महागले असल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. शासकीय परिवहन सेवा प्रभावित होत असल्याचा गैरफायदा घेत खासगी वाहनधारकांकडून जादा प्रवासी भाडे आकारले जात आहे.

Web Title: Lack of market for sale of turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.