शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:16 PM2019-04-10T14:16:08+5:302019-04-10T14:16:13+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील पार्डी तिखे येथील रस्त्यालगत असलेला विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक झाल्याची घटना ९ एप्रिलच्या सायंकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर जैन ते आसेगाव रस्त्यावरील पार्डी तिखे येथील रस्त्यालगत असलेला विशाल वटवृक्ष आगीत जळून खाक झाल्याची घटना ९ एप्रिलच्या सायंकाळी घडली. दरम्यान या घटनेमुळे सायंकाळी या मार्गावरील वाहतूक रात्री २ वाजेपर्यंत प्रभावित झाली होती.
रिसोड तालुक्यातील पार्डी तिखे येथे शिरपुर ते आसेगाव रस्त्यालगत एक विशाल वटवृक्ष असून, सदर वृक्षाला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. शेतातील काडीकचरा पेटवून दिल्याने या वृक्षाला ही आग लागली. आगीमुळे रस्त्यावरच वृक्ष जमिनदोस्त झाल्याने वाहतूकही ठप्प झाली. अग्निशमन विभागाच्या वाहनाने घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन वाहनातील पाणी संपणे आणि पार्डी तिखे येथील वीजपुरवठा खंडीत होणे या दोन्ही बाबीमुळे आग विझविण्यास बराच विलंब झाला. रात्री २ वाजेदरम्यान आग विझविण्यात आली. तोपर्यंत वृक्ष जळून खाक झाला.
महावितरण कर्मचाºयाची दिरंगाई
आग विझविण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने आणि पार्डीतिखे येथील वीजपुरवठा खंडीत असल्याने तेथे उपस्थित शिरपूरचे पोलीस कर्मचारी संतोष पाईकराव यांनी वीज पुरवठा सुरु करण्यासाठी संबंधित वीज कर्मचाºयाला कल्पना दिली. मात्र वीजपुरवठा सुरू करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शिरपूर येथील काही जणांनी शिरपूर येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. कनिष्ठ अभियंता अर्जुन जाधव यांनी तात्काळ संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या.