रिसोड येथे मोफत लसीकरण उपक्रमास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:39+5:302021-06-06T04:30:39+5:30
भारत माध्यमिक शाळा व उत्तमचंद बगडिया महाविद्यालय या दोन लसीकरण केंद्रांवर समता फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल, नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, ...
भारत माध्यमिक शाळा व उत्तमचंद बगडिया महाविद्यालय या दोन लसीकरण केंद्रांवर समता फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल, नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, तहसीलदार अजित शेलार, ठाणेदार जाधव, मुख्याधिकारी गणेश पांडे, वैद्यकीय अधिकारी मोरे, डॉ. शंकर वाघ, उत्तमचंद बगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणास सुरूवात करण्यात आली. लसीकरणासाठी कोविशिल्डचे सहा हजार डोस उपलब्ध करण्यात आले आहे. त्यातील सुमारे हजार डोस पहिल्या दिवशी देण्यात आले.
शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन नगरसेवकांच्या मदतीने लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांना कुपन देऊन त्यांचे लसीकरण करून घेतले जाणार आहे. यामाध्यमातून संपूर्ण शहरातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. समता फाउंडेशनच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद, ग्रामीण रुग्णालय, सिटी कोविड हॉस्पिटल, तहसील कार्यालय, रिसोड पोलीस स्टेशन, भारत माध्यमिक शाळा व उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाचे सहकार्य लाभत आहे.