दारू विकणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:10 PM2020-05-05T17:10:54+5:302020-05-05T17:11:05+5:30

कृषी सेवा केंद्राचा किटकनाशक, खत, बियाणे विक्रीचा परवाना पुढील तीन महिन्यांसाठी निलंबित केला.

License of agricultural service center selling liquor suspended! | दारू विकणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित!

दारू विकणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : किन्हीराजा (ता.मालेगाव) येथील शिव कृषी सेवा केंद्राच्या संचालकाने दुकानातून अवैधरित्या दारूविक्री केली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांत संबंधित केंद्र चालकाविरूद्ध २९ एप्रिल रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. यासह दुकान तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने ४ मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी संबंधित कृषी सेवा केंद्राचा किटकनाशक, खत, बियाणे विक्रीचा परवाना पुढील तीन महिन्यांसाठी निलंबित केला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, पोलिसांनी प्राप्त माहितीवरून २९ एप्रिल रोजी किन्हीराजा येथील शिव कृषी सेवा केंद्रावर छापा टाकला. यावेळी दुकानातून अवैधरित्या दारूविक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून दुकान चालक मोहन जनार्दन भोयर (रा. वांगी, ता.वाशिम) यांच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) म.दा.का. सहकलम १८८, २६९, २७०, साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७, महाराष्ट्र कोविड-१९ विनियमन २०२० कलम ११, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित कृषी सेवा केंद्राची यापुर्वी २० जुलै २०१९ रोजी मालेगाव पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांनी तपासणी केली होती. त्यावेळी रासायनियक खताचे कुठलेही दस्तावेज दुकानात आढळले नाही. यासह साठा रजिस्टर नसणे, साठाफलक व भावफलक न लावणे, मासिक अहवाल सादर न करणे आदी स्वरूपातील आरोप कृषी सेवा केंद्राच्या चालकावर ठेवण्यात आले. चौकशीअंती ते सिद्ध झाले असून २९ एप्रिल रोजी दुकानातून अवैधरित्या दारूविक्री होत असल्याचेही गंभीर प्रकरण घडले.
एकूणच या सर्व चुकीच्या बाबींमुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी संबंधित कृषी सेवा केंद्राचा खत, बियाणे व किटकनाशक विक्रीचा परवाना ३ आॅगस्ट २०२० पर्यंत निलंबित केला आहे.

Web Title: License of agricultural service center selling liquor suspended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.