लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेचे मंगळवारी कारंजातील विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.यावेळी वाशिम जिल्ह्याचे सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील, ना. संजय कुटे, प्रविण पोटे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार नीलक नाईक, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, माजी आमदार राजगुरू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकºयांच्या आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली. शेतकºयांचा सातबारा कोरा होईपर्यंत पीककर्ज माफी सुरूच राहणार असून, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात ठिंबक सिंचन देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सिचंनाचे रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण केले. त्यातुन हजारो हेक्टर सिंचन क्षमता वाढली. ग्रामीण भागातील हजारो किमी अंतराचे रस्ते बांधुन गावांना शहरांशी जोडले. समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातही भर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत शासनाने राबविलेल्या विविध आरोग्यविषयक योजनेचा जनतेला चांगलाच फायदा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी अडाण यासह जिल्हयात अन्य बॅरेजेसची मागणी केली. सभेला ३० हजारावर जनसमुदाय उपस्थित होता. ईव्हीएमवर आरोप न करता जनतेच्या मनाचा कौल घ्यावा !विरोधी पक्षांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ही बाब चुकीची असून, ईव्हीएमवर आरोप न करता विरोधकांची जनतेच्या मनाचा कौल घ्यावा, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. आम्ही ईव्हीएममूळे नव्हे; तर जनतेच्या मनापर्यंत पोहोचल्यानेच बहुमताने कौल मिळाला, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ३७० कलमाबाबत भाष्य टाळलेकेंद्र सरकारने कश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासीक निर्णय सोमवारी घेतला. या निर्णयावर कारंजा येथील जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भाजपा-सेना युतीचे दिले संकेतपाच वर्षात भाजपा सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना जनतेसमोर मांडून भाषणाच्या अखेरीस आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपा-सेनेचीच सत्ता येणार असे सांगत भाजपा-सेना युतीचे संकेत दिले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 5:33 PM