‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचनांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:26 PM2020-11-04T12:26:58+5:302020-11-04T12:27:09+5:30
Washim News आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात १ ऑक्टोंबर २०२० पासून लॉकडाऊनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या २९ ऑक्टोबर २०२० च्या आदेशानुसार सदर मार्गदर्शक सूचना आता ३० नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी परवानगी दिलेली दुूकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास यापुढेही परवानगी राहणार असून, दुकानांच्या वेळाही तुर्तास तरी मागील महिन्याप्रमाणेच ठेवण्यात आल्या आहेत. अनलाॅकच्या टप्प्यात शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ गजबजत असल्याचे दिसून येते. नागरिकांनी मास्क किंवा रुमालचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.