महाबीज करणार शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:53 AM2020-06-01T10:53:33+5:302020-06-01T10:53:42+5:30
संबंधित शेतकºयाने महाबीजच्या प्रमाणित वाणांची पेरणी केली असणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गतवर्षी अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे राज्यात या पिकाचे अपेक्षीत प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले नाही. याच बियाण्यांचा संभाव्य तुटवडा दूर करण्यासाठी महाबीज त्यांचे सोयाबीन खरेदी करणार आहे. महाबीजसाठी बिजोत्पादन करणारे शेतकऱ्यांशिवाय इतरही शेतकºयांकडून हे सोयाबीन घेतले जाणार आहे; परंतु संबंधित शेतकºयाने महाबीजच्या प्रमाणित वाणांची पेरणी केली असणे आवश्यक आहे.
गतवर्षीच्या हंगामात बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन काढणीवर आले असताना आणि अनेकांनी सोयाबीन काढून सुड्या लावून ठेवल्या असताना अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे काढून ठेवलेल्या सोयाबीनसह काढणीवर आलेल्या आणि शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसून, या पिकाचा दर्जा खालावला. परिणामी, या पिकातून अपेक्षीत प्रमाणात लागवडी योग्य बियाण्यांची निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या वाणाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी सचिवांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे (महाबीज) महाबीजच्या वाणाची पेरणी केलेल्या शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी करून बियाण्यांचा तुटवडा दूर करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला महाबीजच्या व्यवस्थापकांनी मान्यता दिली. त्यानुसार आता ज्या शेतकºयांनी गतवेळच्या खरीप हंगामात महाबीजच्या प्रमाणीत सोयाबीन वाणांची पेरणी केली आहे. त्या शेतकºयांकडून सोयाबीन विकत घेण्याची तयारी सुरू केली आहे. महाबीजमार्फत सत्यप्रत वाण म्हणून हे सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.
उगवणशक्ती चाचणी करूनच खरेदी
महाबीजच्या प्रमाणीत वाणांची पेरणी केलेल्या शेतकºयांकडून उत्पादीत सोयाबीन महाबीजमार्फत खरेदी केले जाणार असले तरी शेतकºयांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीनची उगवणशक्ती किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तेच खरेदी केले जाणार आहे. यासाठी सदर शेतकºयांच्या सोयाबीनची खरेदी करण्यापूर्वी त्याची उगवणशक्ती तपासली जाणार आहे.
हमी दरापेक्षा १० टक्के अधिक दर
महाबीजच्या उपक्रमांतर्गत ज्या शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. त्या शेतकºयांना सद्यस्थितीत असलेल्या केंद्रशासनाकडून जाहीर हमीदरापेक्षा १० टक्के अधिक दराने मोबदला दिला जाणार आहे. यासाठी महाबीजकडे अनेक शेतकºयांनी आपल्या सोयाबीन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी आणून दिले आहेत.