लोकमत न्यूज नेटवर्कमुंगळा (वाशिम) - मुंगळा येथून जवळच असलेल्या श्री ऋषी महाराज देवस्थान तामकराड ( रेगाव) ता. मालेगाव येथे नागपंचमी निमित्त ७ क्विंटल गव्हाची पुरी व भाजीच्या महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांना करून विविध कार्यक्रमाची सांगता झाली.या सोहळ्याचे आयोजन प पू बबन महाराज यांनी केले होते. येथील देवस्थानवर दरवर्षी महाशिवरात्री, तुळसीचे लग्नाचा उत्सव, नागपंचमी सणानिमित्त विविध कार्यक्रम व दर सोमवारी भाविक दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात. सोमवारी महाप्रसादाचे वितरण नागपंचमीला सकाळी १० वाजता प.पू. बबन महाराज मोहळे यांचे हस्ते रांगेतील भाविकांना पुरी ,भाजीचा प्रसाद देऊन प्रारंभ करण्यात आला .याप्रसंगी भाविकांना बारी पद्धतीने सेवेकरीनी वेग- वेगळ्या रांगेतील महिला- पुरुषांना प्रसाद वाटप केला. तामकराड हे अति प्राचीन काळातील दाट अरण्यात, निसर्गरम्य वातावरणात श्री ऋषी मुनींच्या वास्तव्याने पावन झालेले संस्थान आहे..ऋषी महाराजावर भाविकांची श्रद्धा आजही आहे. मुंगळा रेगाव व खेर्डी परिसरातील शेतकरी दर सोमवारी शेतातील नांगर, वखर डवरणी, पेरणी व कोणतेही काम शेतात करीत नाहीत. येथे बाराही महीने विविध धार्मिक कार्यक्रम भाविक मोठ्या भक्तिने साजरे करतात.
तामकराड येथे नागपंचमी निमित्त पुरी- भाजीचा महाप्रसाद; हजारो भाविकांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 4:37 PM