कारंजातील सकल जैन समाज बांधवांच्या वतीने महावीर जयंती कोरोनाचे नियम पाळत घरोघरी साजरी करण्यात आली. या वेळी कारंजातील भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद लाठीया, कोषाध्यक्ष कांतीलाल बरडीया, सचिव सुगरचंद देवडा यांच्याकडून ऑक्सिजनची गरज लक्षात घेता विदेशी निर्मितीचे उच्च तंत्रज्ञानाने निर्मित १ आक्सिजन मशीन भेट देण्याचे पत्र सकल श्वेतांबर जैन संघामार्फत देण्यात येणार असल्याचे पत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने यांना देण्यात आले.
०००
कारंजा शहरातील गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये याकरिता कारंजा शहरातील दानशूर व्यक्ती पुढे येऊन ऑक्सिजनकरिता उपजिल्हा रुग्णालयात आर्थिक मदत करत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना होणार आहे.
- डाॅ. भाऊसाहेब लहाने,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय