मंगरुळपीरचे पुरुष भजनी मंडळ राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 02:56 PM2018-10-09T14:56:36+5:302018-10-09T14:57:17+5:30
मंगरुळपीर (वाशिम): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे अकोला येथील ललीत कला भवन येथे आयोजित भजन स्पर्धेत मंगरुळपीर येथील भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे अकोला येथील ललीत कला भवन येथे आयोजित भजन स्पर्धेत मंगरुळपीर येथील भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. तर महिला भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
या भजन स्पर्धेत बुलढाणा,अकोला, वाशिम या तिन जिल्ह्यातील एकुण २५ मंडळे सहभागी झाली होती. त्यापैकी मंगरुळपीर येथील कामगार केंद्रामार्फत सहभागी पुरुष भजन संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांची २९ व ३० जानेवारी २०१९ रोजी होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या भजन मंडळात सिताराम महाराज दबडे, दिनकर भामोद्रे, रमेश मुळे, मोतीराम टोपले, गजानन वाईकर, नाना शिंदे, गणेश साबळे, प्रमोद खाडे, सागर धनवे, राजेंद्र लांडगे, विकास शिंदे, दिगंबर शिंगणे हे सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अकोला जिल्हा संघटक किशोर वाघ व महेश गणगणे यांचे हस्ते करण्यात आले, तसेच महिला भजन स्पर्धेत मंगरुळपीर कामगार कल्याण केंद्राच्या महिला भजनमंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकुण २१ महिला भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. मंगरुळपीरच्या भजन मंडळात गायिका ललिताबाई शिंगणे, नंदाबाई शिंदे तर सहगायिका म्हणून कल्याणी लांडगे,आश्विनी भोयर, सुनिता हिवरकर, मीना टोपले, सुप्रिया शेळके, वनिता धनवे, टाळवादक आश्विनी वाघ, मंदा मोरे तर हार्मोनियम सिताराम महाराज दबडे, तबलावादक गजानन वाईकर हे सहभागी झाले होते.