मंगरुळपीर बाजार समिती आठवड्यापासून बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:19 PM2018-12-29T13:19:05+5:302018-12-29T13:19:19+5:30
मंगरुळपीर ( वाशिम ): व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेतला आहे. त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर ( वाशिम ): व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेतला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून मंगरुळपीर बाजार समिती बंदच आहे. त्यात शनिवार, रविवार हे दिवस सुटीचे असल्याने आता सोमवारीही बाजार समिती सुरू होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून, व्यापारी, अडत्यांच्या व्यवहारामुळे शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे.
मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाºया व्यापाºयांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु महिनाभरापासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले आहे. बाजारात शेतमाल घेऊन येणाºया शेतकºयांनी अडत्यांकडे शेतमाल टाकल्यानंतर लिलावाद्वारे विक्री करण्यात येते. या मालाचा लिलाव झाल्यानंतर अडत्याकडून शेतकºयांना एक टक्का अडतीची रक्कम कापून चुकारे करण्यात येतात, तर शेतमालाची खरेदी करणारे व्यापारी अडत्यांना सात दिवसांच्या मुदतीत शेतमालाची रक्कम देतात. यावरच बाजार समितीमधील शेतकरी, अडते आणि व्यापाºयांचे व्यवहार चालतात; परंतु मंगरुळपीर बाजार समितीअंतर्गत गेल्या महिनाभरापासून अडत्यांकडून शेतमालाची खरेदी करूनही व्यापाºयांनी त्यांचे चुकारे केले नाहीत, तर अडत्यांनी मात्र शेतकºयांच्या रकमेचे चुकारे केले आहेत. आता पुढील व्यवहारासाठी त्यांच्याकडे रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच व्यापारी चुकारे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अडते संघटनेने बाजार समिती सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तथापि, अद्यापही व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे न दिल्याने बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बंदच आहेत. या प्रकारामुळे शेतकºयांचे मात्र नाहक नुकसान होत असून, रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांवर फवारणी करणे, खत देणे आदि कामांसाठी त्यांना पैशांची अडचण भासत आहे.