मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 02:33 PM2019-06-01T14:33:19+5:302019-06-01T14:33:47+5:30

मंगरुळपीर : मंगरूळपिर तालुक्यातील रोड वर २० हजार लिटर पाण्याचे टँकर सर्रासपणे महामार्गाच्या कामाला लागत आहे.

Mangurpire city's waterway highway contractor scare! | मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला!

मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : मंगरूळपिर तालुक्यातील रोड वर २० हजार लिटर पाण्याचे टँकर सर्रासपणे महामार्गाच्या कामाला लागत आहे. रोजचे ५० टँकर या  कामासाठी लागत असल्याने शहरवासियांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यावर कारंजा - वाशीम हायवे कंत्राटदार डल्ला मारत असल्याचे शहरवासियांमध्ये बोलल्या जात आहे.
मंगरुळपीर तालुक्यात सुरु असलेल्या महामार्गासह ईतर रस्त्याचे कामे वेगाने सुरु आहेत. हे कामे करतांना अनेक रस्त्यांवर पाणी टंचाईमुळे पाणी टाकल्या जात नसतांना सुध्दा दररोज २० हजार लिटरचे ५० टँकर म्हणजेच दिवसाचे १० लाख लिटर पाणी रस्त्यासाठी वापरण्यात येत आहेत. हे पाणी त्यांना परिसरातीलच गावकरी विकत असल्याने व त्यांना त्याचे चांगले दाम मिळत असल्याने शहरात फिरणाºया टँकरच्या किंमतीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मंगरुळपीर शहरालगत असलेल्या सोनखास, शहापूर येथील अनेकांच्या विहिरींवरुन रस्ता कामाचे कंत्राटारांनी करार केल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. या कंत्राटदारांमुळे शहरात पाणी विक्रेते जवळपास बंद झाले आहेत. जे आहेत, ते सुध्दा शहरवासियांकडून अव्वाच्या सव्वा भाव घेत असल्याने शहरवासियांची डोकेदुख्ी वाढली आहे.याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष दिसून येत नसल्याचे नागरिक बोलतांना दिसून येत आहेत.
 तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी विक्री करणाºयांमुळे भुगर्भातील पाण्याची कमी होणारी  पातळी थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शहरवासियांतून केली जात आहे.


पाण्याचा जपून वापर करा जलदूत इंगोले
तालुक्यातील पाणी टंचाई च्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तालुक्यातील नागरीकांनी पाण्याचा जपून वापर  करण्याचे आवाहन  जलदुत रवींद्र इंगोले यांनी शहरवासीयांना केले आहे. मागील काही वर्षात तालुक्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी पडला असून भूगभातील पाण्याचा अमर्याद उपसा होत आहे. तसेच पाण्याची पातळी खाली गेली आहे.असुन मंगरूळपीर तालुक्यात यापूर्वी पाण्याची भरपूर टंचाई भासली.मागील वर्षी  इतिहासात पहिल्यांदाच तालुक्यात  पाणी पुरवठा करणाºया टँकरची संख्या २०० च्या वर पोहचली होती.

Web Title: Mangurpire city's waterway highway contractor scare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.