मानोरा नगरपंचायत : नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:48 PM2020-05-12T17:48:00+5:302020-05-12T17:48:07+5:30
पंधरा नगरसेवकनी ११ मे रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला .
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा नगर पंचायतच्या नगराध्यक्षा बरखा अलताब बेग यांच्यावर नगरपंचायतच्या पंधरा नगरसेवकनी ११ मे रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला . यासंदर्भात लोकमतच्यावतीने ‘नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली’ यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.
मानोरा नगर पंचायतच्या नगराध्यक्षा बरखा बेग यांच्यावर टाकण्यात आलेल्या अविश्वास मध्ये नगराध्यक्षा नगरसेवकांना विश्वासात घेत नाही , विकास कामे करत नाही विकासामध्ये अडचणी निर्माण करतात, नगर पंचायतची सभेची वेळ व माहीती न देता परस्पर ठरवितात , शासकीय योजनेचा लाभ जवळच्या लोकाना देतात अशा वेगगळ्या कारणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला .
मानोरा नगर पंचायतवर सर्व पक्षीय नगरविकास आघाडीची सत्ता आहे . विद्यमान नगराध्यक्षा ह्या याच आघाडीच्या नगराध्या म्हणुन आॅगष्ट १८ मध्ये विराजमान झाल्या होत्या , परंतु सर्वक्षीय आघाडीच्या नगरसेवकांना विकास कामात विश्वासात घेत नसल्यामुळे नगरसेवक त्यांच्या विरोधात उभे ठाकले. मानोरा नगरपंचायतची सदस्या संख्या सतरा आहे. त्या पैकी पंधरा नगरसेवक त्यांच्या विरोधात गेले आहे . नगराध्यक्षांवर टाकण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर नगरसेवक अमोल प्रकाश राऊत, रेखाताई श्यामराव पाचडे , छाया गुणवंत डाखोरे , शेख फिरोजाबी शेख मुस्ताक , , शेख आबेदाबी नाजीम, सुनेहरा परविन वहिदोदीन शेख, सुनिता संतोष भोयर , ऊषाताई शेरसिंग जाधव , शेख वहीद शेख अयुब , एहफाज शहा मेहबुब शहा , ज्ञानेश्वर विठ्ठल गोतरकर, मंजुषा महेश निशाने, हसिनाबी जब्बार शहा , अहमद बेग चांद बेग , गणेश परशराम भोरकडे आदीच्या स्वाक्षरी आहेत. मानोरा नगराध्यक्षपद हे एससी प्रवगार्साठी राखीव असून या घडामोळीमुळे नगरपंचायत चर्चेत आली आहे.
नगरसेवकांच्या खोट्या कामाना मंजुरी न दिल्यामुळे माझ्याविरूध्द अविश्वासाचे कारस्थान रचल्या जात आहे . मी कोणाच्या हातची कटपुतली न व्हता सामर्थ्य पणे नगराध्यक्ष पदाचा कारभार संभाळत आहे.
- बरखा अलताब बेग, नगराध्यक्षा मानोरा