वरोली येथे मानोरा पोलीसांचे 'चेक-पोस्ट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:29 PM2020-04-15T17:29:16+5:302020-04-15T17:29:25+5:30
मानोरा पोलीसानी वरोली येथे चेकपोस्ट टाकन गाड्यावर आवर घातला
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: जिल्हयात प्रवेश बंदी असताना यवतमाळ जिल्हयातुन वरोली - कारखेडा मार्गे अनेक वाहने मानोरा तालुक्यात दाखल होत असल्यासंदर्भात लोकमतने १४ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाच्यावतिने वरोली येथे पोलीसांचे चेकपोस्ट उभारण्यात आले.
मानोरा जिल्हयात प्रमुख बंदी असताना यवतमाळ जिल्हयातुन वरोली मार्गे मानोरा तालुक्यात प्रवेश करणाº्या वाहणावर मानोरा पोलीसानी वरोली येथे चेकपोस्ट टाकन गाड्यावर आवर घातला
यवतमाळ जिल्यातील दारव्हा तालुक्यातुन कुर्हाड -कार्ली मार्गे वरोली व दिग्रस तालुक्यातुन हरसुल- मोरखेड मार्गे वरोली येथुन कारखेडावरून मानोरा तालुक्यातत अनेक गाड्याचा मानोरा तालुक्यात प्रवेश व्हायचा. जिल्हा प्रवेश बंदीला हुलकावनी देऊन चोरटा मार्ग बाहेरील नागरीकांनी निवडला होता . चोरट्या मागार्ने प्रवेश होत आहे याची कल्पना सेवादासनगरचे पोलीस पाटील मोहन राठोड , वरोलीचे पोलीस पाटील विजय जारंडे , कारखेचे पोलीस पाटील वासुदेव सोनोने , यांनी पोलीस निरीक्षक शिशीर मानकर यांच्या लक्षात आणुन दिली. तसेच याबाबत लोकमतनेही वृत्त प्रकाशित केल्याने मानकर यांनी तातडीने वरोली येथे चेक पोस्ट टाकुन बाहेर जिल्हातुन प्रवेश करणाº्या गाड्यावर आवर घातला. चिखलीचे पोलीस पाटील राठोड , विजय राठोड, पो.कॉ.गणेश मिसार, जानुसिंग महाराज यांची यावेळी उपस्थिती होती.