मास्क वापराकडे अनेकांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:42 AM2021-03-16T04:42:02+5:302021-03-16T04:42:02+5:30
.......... जिल्हा हिवतापची इमारत जीर्ण वाशिम : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधादेखिल ...
..........
जिल्हा हिवतापची इमारत जीर्ण
वाशिम : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधादेखिल मिळणे दुरापास्त झाले आहे. नवी इमारत मिळण्याची मागणी होत आहे.
.........
जिल्हा परिषदेत भीतीदायक वातावरण
वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांत २० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. यामुळे प्रत्येक विभागात भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
.......
खासगी दवाखान्यांत लसीकरणासाठी गर्दी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शहरातील खासगी दवाखान्यांना यासाठी परवानगी देण्यात आली असून दैनंदिन लसीकरणासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
.........
देयक भरताच वीज पुरवठा सुरळित
मालेगाव : विद्युत देयक थकीत असलेल्या घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करणे सध्या सुरू आहे; मात्र देयक अदा करताच वीज पुरवठा तत्काळ सुरळित करून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
.........
शुद्ध पाणी पुरविण्याची मागणी
वाशिम : शहरातील काही भागात सोमवारी सकाळी काही प्रमाणात गढूळ पाणी पुरवठा झाला. नगर परिषदेने लक्ष पुरवून शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी सचिन आळणे, सागर चहारे, सुमीत चव्हाण आदिंनी निवेदनाव्दारे केली.
...........
जऊळकात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायतीने लक्ष पुरवावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
........
किन्हीराजा येथे जनजागृती
वाशिम : किन्हीराजा (ता.मालेगाव) येथे सोमवारी ग्रामपंचायतीने कोरोनाविषयक जनजागृती केली. तोंडाला मास्क वापरण्यासह हात नियमित स्वच्छ ठेवा. लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्या, असे आवाहन यादरम्यान करण्यात आले.
............
दुचाकींवर तिबल सीट वाहतूक
वाशिम : वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही शहरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहनांवर तिबल सीट वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शहर वाहतूक विभागाने याप्रकरणी सोमवारी दुपारच्या सुमारास रिसोड नाका येथे अनेकांवर कारवाई केली.