वॉटर कप स्पर्धेतील अनेक गावे झाले पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:18 PM2018-06-15T14:18:58+5:302018-06-15T14:18:58+5:30
कारंजा लाड - दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दुस-या वर्षी कारंजा तालुक्यात राबविण्यात आली.
कारंजा लाड - दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दुस-या वर्षी कारंजा तालुक्यात राबविण्यात आली. या स्पर्धेत ५९ गावानी सहभाग नोंदउन स्पर्धेदरम्यान गावक-यांना श्रमदानातून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करत ४५ दिवसात तापत्या उन्हात जलसंधारणाची कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली. मात्र केलेल्या कामाचे फलीत व्हाव म्हणुन वाट होती. पावसाने गेल्या तिन चार दिवसापासून चांगलीच हजेरी लावली. परीणामी कारंजा तालुक्यातील काम केलेल्या गावात श्रमदान व यत्रांच्या सहाहयाने जलसंधारणाची कामे झाली. श्रमक-यांनी केलेल्या श्रमदानातून जलसमृध्दी साकारली असल्याचे दिसून येत आहे.
पावसाचे पाणी जमिनिवर पडल्यानंतर वाहून जाते. परीणामी गावक-यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. धावणा-या पाण्याला चालायला शिकवणे व चालणा-या पाण्याला थांबायला शिकविणे व थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिकविणे. या पाणी फांउडेशनच्या सुत्रानुसार कारंजा तालुकयातील ५९ गावक-यांनी सत्यमेव जयते वॉटर कप चे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यापैकी विळेगाव, काकडशिवनी, बेलमंडळ, दोनद, पिंपळगाव, धनज बु, धोत्रा जहॉगीर, बांबर्डा, पोहा, शहादतपुर या गावातजलंसंधारणाची कामे यत्रांच्या व श्रमदानाच्या माध्यमातून झाली. स्पर्धेदरम्यान गावक-यांनी ४५ दिवस गावक-यांनी श्रमदान करून आपल्या गावात सि.सि.टी, डिप.सि.सिटी, नाला खोलीकरण, शेततळे गॉबीयन बंधारा, एल.बी.एस आदी जलसंधारणाची कामे गावक-यांनी केली. गावक-यांनी श्रमशक्ती वापरून गावात पाणी साठा निर्माण करण्यासाठी जी जलपात्रे तयार केलीत. त्या फक्त वाट होती पावसाची मात्र पावसाने गेल्या दोन दिवसापासून जोरदार हजेरी लावली. श्रमातून तयार केलेल्या पात्रामध्ये मोठया प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला. गावातील पाणी वाहुन गेले नाही. हे गावात साचलेले पाणी पाहुन गावकरी आनंद व्यक्त करीत आहे. त्या पाण्यासोबत शेल्पी काढून श्रमाचे पाणी त्यांच्या डोळयात पाणी दिसत आहे. जलसंधारणाच्या कामाकरीता कारंजा प्रशासनाचे सहकार्य मिळाले असल्याची माहीती तालुका समन्वयक श्याम सवाई यांनी दिली.