वाशिम जिल्ह्यात अनेक मतदारांना मिळाली नाही 'वोटर स्लिप'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 04:09 PM2019-04-11T16:09:49+5:302019-04-11T16:10:51+5:30
वोटर स्लीप मिळाली नाही.
Next
ल ोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निवडणूक विभागातर्फे जिल्ह्याच्या काही भागातील मतदारांना वोटर स्लिप वितरित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली आणि अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरील यादीत मतदार नाव आणि क्रमांक शोधताना आढळून आले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मतदारांना वितरित करण्यासाठी प्रशासनाला ६४३९८३ फोटो मतदार स्लीप प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६१९३२१ मतदार स्लीप वितरीत केल्या असल्याचे दोन दिवसांपूर्वी निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यात वााशिम विधानसभा मतदारसंघातील ३३०८२१ मतदारांना, तर कारंजा विधानसभा मतदारसंघातील २८८५०० मतदारांना फोटो मतदार स्लीप वितरीत करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; परंतु अनेक मतदारांपर्यंत या स्लीप पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाला आणि मतदान केंद्रावर मतदारयादीत नाव आणि क्रमांक पाहण्यातच त्यांना मोठा वेळ खर्च करावा लागला. काही मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना आधी आपले मतदान कार्ड तपासून ताब्यात घेतल्यानंतरच मतदानाचा हक्क बजावावा लागल्याचे दिसून आले.