मॅरेथॉनमध्ये धावले विदर्भासह मराठवाडयातील स्पर्धक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 04:25 PM2020-01-31T16:25:54+5:302020-01-31T16:25:59+5:30
विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूरसह मराठवाडयातील हिंगोली, कळमनुरी, कनेरगाव नाका येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पोलीस दलाच्यावतिने महिलांच्या सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी ‘रन फॉर हर मॅरेथान’ चे वाशिम जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर ३१ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजता आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूरसह मराठवाडयातील हिंगोली, कळमनुरी, कनेरगाव नाका येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. हजारो महिला, पुरुषांसह युवक-युवतीसह शालेय विद्यार्थ्यांची उपस्थितीती होती. पहाटेच्या थंडीतही स्पर्धकांची उपस्थिती वाखाण्याजोगी होती.
वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे महिला सुरक्षेच्या व्यापक जनजागृतीसाठी आयोजित मॅरेथॉन तीन गटात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व वयोगटातील पुरुषांकरिता ५ किलोमिटर, सर्व वयोगटातील महिलांकरिता ३ किलोमिटर तर जेष्ठ नागरिकांसाठी २ किलोमिटरचा समावेश होता. याकरिता आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी ऋषिकेष मोडक, श्रीमती मोडक, पोलीस अधिक्षक वसंत परदेसी, वाशिम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक शंकरलालजी हेडा, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटेय, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बन्सोड, पोलीस उपअधिक्षक गृह मृदूला लाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुणराव सरनाईक, ठाणेदार योगीता भारव्दाज, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक शिवा ठाकरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी ऋषिकेष मोडक यांनी उपस्थित स्पर्धकांना संबोधित करताना म्हटले की, पोलीस विभागाच्यावतिने महिलांच्या सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत गौरवदगार काढले. तसेच पोलीस अधिक्षक वसंत परदेसी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचा पोलीस अधिक्षकांच्याहस्ते स्मृतीचिन्ह तर काहींना वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने नियोजनबध्द कार्यक्रम घेण्यात आला. पहाटे ७ वाजता सुरु झालेली ही स्पर्धा ११ वाजेदरम्यान आटोपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यामध्ये सर्व वयोगटातील पुरुषांमध्ये ५ किलोमिटरमध्ये प्रथम परभणी येथील छगन बोंबले, महिलामध्ये वाशिम जिल्हयातील पार्डी येथील तनवी खोरणे यांनी क्रमांक प्राप्त केला. प्रौढ गट पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक वाशिम येथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मोहन पवार तर महिलामध्ये आशा खडसे यांनी क्रमांक मिळविला. या स्पर्धेत दिव्यांग सुनील इंगळे सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार यावेळी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा परिषद सदस्य तथा महाराष्टÑ सायकलींग उपाध्यक्ष धनंजय वानखडे यांनी केले. यावेळी क्रीडा प्रशिक्षक किशोर बोंडे, संजय शिंदे, नारायण ढेंगळे, बाळासाहेब गोटे, वैभव कडवे, प्रल्हाद आळणे, चेतन शेंडे, मिर्झा यांच्या मोलाचे सहकार्य लाभले.
मॅरेथॉनमध्ये स्वच्छता अभियान व बेटी बचाओ बेटी पढाओबाबत जनजागृती
पोलीस विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतिने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये स्वच्छता अभियान व बेटी बचाओ बेटी पढाओबाबत जनजागृती होतांना दिसून आली. वाशिम नगरपरिषदेच्यावतिने या स्पर्धेत सहभाग घेणाºयांना देण्यात आलेल्या टीशर्टवर मागील बाजुला स्वच्छ भारत बाबत तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ स्लोगन व लोगो देऊन याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेकांनी याबाबत कौतूक केले.
जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मॅरेथॉनमध्ये जेष्ठ नागरिकांनी दाखविलेला सहभाग युवकांनाही लाजवेल असा दिसून आला. यामध्ये तब्बल ६८ जेष्ठ नागरिकांची जरी नोंद दिसून आली तरी शंभरच्यावर जेष्ठ नागरिक धावतांना दिसून आले. जेष्ठ नागरिकांचा सहभाग पाहता जिल्हाधिकारी ऋषिकेष मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांच्याहस्ते दोन जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पुरुषांमध्ये कालीसेठ भिमजिवनानी तर महिलांमध्ये वाघमारेताई यांचा समावेश होता.
४मॅरेथानध्ये महिलांसह मुलींचाही मोठया प्रमाणात समावेश दिसून आला. विशेष म्हणजे मॅरेथॉनवरील मार्गावर लागणाºया शाळेच्यावतिने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर उभे करुन सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढविला होता.
- सर्व वयोगटातील पुरुषांकरिता ५ किलोमिटर विजयी स्पर्धक
क्रमांक नाव/ गाव
प्रथम छगन बोंबले, परभणी
व्दितीय शुभम तिवसकर, वरुड (अम.)
तृतीय सुरज गोडघासे, केकतउमरा
चतुर्थ गणेश घाडगे, केकतउमरा
पाचवा ओम कनेरकर, हिंगोली
सहावा गौरव जाधव, काटा
- सर्व वयोगटातील महिलाकरिता ५ किलोमिटर विजयी स्पर्धक
क्रमांक नाव/ गाव
प्रथम तनवी खोरणे,पार्डी
व्दितीय वैष्णवी आहेरवार, पार्डी
तृतीय नंदिनी शिंदे, वाशिम पोलीस
चतुर्थ सिमा वाणी, पार्डी
पाचवा नंदिनी वानखडे, वाशिम
सहावा सुनिता फुलउंबरकर, वाशिम
-प्रौढ गट पुरुष
क्रमांक नाव/ गाव
प्रथम मोहन पवार, वाशिम पोलीस
व्दितीय प्रल्हाद नानवटे
तृतीय अर्जुन मोटे
चतुर्थ प्रदिप गोटे
पाचवा दशरथ वारकड
सहावा भीमराव राठोड
-प्रौढ गट महिला
क्रमांक नाव/ गाव
प्रथम आशा खडसे
व्दितीय अरुणा ताजणे
तृतीय रत्नमाला उबाळे
चतुर्थ शोभा मोटे
पाचवा विमल सावळे
सहावा सुशिला शिंदे
- स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार
डॉ. सपना राठोड
डॉ. मंजुश्री जांभरुणकर
डॉ. अंजली दहापुते
विजयश्री मोडक
लिना बन्सोड
निलोफर शेख
स्वाती रवणे
दिव्यांग सुनिल इंगळे
ठाणेदार योगीता भारव्दाज