रिसोड तालुक्यात आरक्षणात किरकोळ बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:21+5:302021-02-06T05:17:21+5:30

अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी गतवेळी व्याड, कळमगव्हाण, नंधाना, रिठद, बिबखेड, कोयाळी बु., कोयाळी खु., धोडप खु., शेलू खडसे या ...

Minor changes in reservation in Risod taluka | रिसोड तालुक्यात आरक्षणात किरकोळ बदल

रिसोड तालुक्यात आरक्षणात किरकोळ बदल

Next

अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी गतवेळी व्याड, कळमगव्हाण, नंधाना, रिठद, बिबखेड, कोयाळी बु., कोयाळी खु., धोडप खु., शेलू खडसे या ग्रामपंचायतींचे सरपंचपद राखीव होते. त्यात यंदा कुठलाही बदल झालेला नाही. यासह अनुसूचित जमाती महिलांकरिता मोठेगाव आणि चिचांबाभर या दोन ग्रामपंचायती असून त्या यंदाच्या आरक्षण सोडतीतही कायम राहिल्या. नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील आरक्षण सोडतीमध्ये मात्र काही ग्रामपंचायतींचे फेरबदल झालेले आहेत. त्यानुसार हिवरापेन, मोहजा इंगोले, देऊळगाव बंडा, पिंपरखेड, मोरगव्हाण, गणेशपूर, केनवड, मांडवा आदी ग्रामपंचायती नामाप्र महिला प्रवर्गासाठी; तर पार्डी तिखे, किनखेडा, घोटा, हराळ, चाकोली, आसेगाव पेन, लोणी बु., मांगूळ झनक, करडा, निजामपूर, बाळखेड, वाडी रायताळ आदी ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली.

Web Title: Minor changes in reservation in Risod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.