बहुतांश आरक्षण पूर्वीप्रमाणेच, अनेकांचा हिरमाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:17+5:302021-02-06T05:17:17+5:30
वाशिम तालुक्यात अनुसूचित जाती महिलांच्या आरक्षणात गतवेळी असलेली खंडाळा खु. ही ग्रामपंचायत यंदा वगळून त्याठिकाणी कोंडाळा झामरेचे आरक्षण निघाले ...
वाशिम तालुक्यात अनुसूचित जाती महिलांच्या आरक्षणात गतवेळी असलेली खंडाळा खु. ही ग्रामपंचायत यंदा वगळून त्याठिकाणी कोंडाळा झामरेचे आरक्षण निघाले आहे. धानोरा बु., पार्डी, एकबुर्जी, तांदळी बु., सावळी, इलखी, वाई, केकतउमरा, काटा, वारा जहाँगीर आणि हिवरा रोहिला या ग्रामपंचायतींचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम राहिले. अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असलेल्या उकळीपेन आणि सुपखेला या दोन्ही ग्रामपंचायतींच्या आरक्षणात कुठलाच बदल झाला नाही. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यामध्ये पूर्वीची ग्रामपंचायत गोंडेगाव वगळून त्याठिकाणी चिखली बु. झाकलवाडी, हिस्से चिखलीचा समावेश झाला; तर धानोरा खु., कानडी गोन्ही, फाळेगाव थेट, वारला, सावरगाव बर्डे, धारकाटा, बाभूळगाव, हिस्से बोराळा, तामसाळा, तामसी, कार्ली आणि सोनखास या ग्रामपंचायतींचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम राहिले. सर्वसाधारण महिला प्रवर्गात वांगी, साखरा, फलसाखरा, भटउमरा, आडगाव खु., सावरगाव जिरे, खरोळा, तोंडगाव, टो, पार्डी आसरा, चिखली खु., कामठवाडा, वाघजाळी, शेलगाव, उमरा मैद, जांभरूण जहां, तांदळी शेवई, जनुना, सोनवळ, धुमका, शेलू बु., अडोळी, जयपूर, एकांबा, ब्रम्हा, गोंडेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश झालेला आहे.