शिरपूर (वाशिम) : येथे १६ मार्च रोजी मल्हारराव होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी गावातून ३०० युवकांनी मोटारसायकल रॅली काढली होती.
सर्वप्रथम होळकर चौकात वाशिमचे न.प.सदस्य बाळू मुरकुटे, डॉ.गजानन ढवळे, नारायण बोबडे, ज्ञानेश्वर गांवडे, बबन मिटकरी, गजानन जटाळे, शरद ढवळे यांच्या हस्ते मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर आयोजित रॅलीला झेंडी दाखविण्यात आली. पिवळया पताका घेवून ३०० युवकांची मोटर सायकल रॅली गावातून घोषणा देत निघाली. रॅली बसस्थानक, रिसोड फाटा चौकातून मार्गकण करीत खंडोबा संस्थान वरून शिवाजी चौकात आली. तेथे बजरंग बली मंदिराच्या आवारातील मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याठिकाणी पंकज देशमुख मित्र मंडळाच्यावतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले व रॅलीतील युवकांना अल्पोहार देण्यात आला.
रॅलीच्या वतीने ठिकठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या रॅलीमध्ये श्रीकांत ढवळे, वैभव ढवळे, विजय गावंडे, संतोष घाटे, शुभम मस्के, सुनिल घोडके, आकशा गावंडे, सखाराम बोबडे, गणेश बोबडे, गजानन खोरणे, प्रल्हादराव बोबडे, बाळू घोडके, अभिजित ढवळे, मनोज गावंडे, पवन गावंडे, सह ३०० युवकांनी मोटार सायकल रॅलीत भाग घेतला होता.