अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन; रयत क्रांती संघटनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 07:21 PM2017-11-10T19:21:50+5:302017-11-10T19:22:36+5:30
रिसोड : शेतक-यांचे विद्युत देयक माफ करावे तसेच सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा करावा, अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला. सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिका-यांनी शुक्रवारी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : शेतक-यांचे विद्युत देयक माफ करावे तसेच सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा करावा, अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला. सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिका-यांनी शुक्रवारी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.
यावर्षी रिसोडसह वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे खरिप हंगामात शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. दुष्काळसदृश परिस्थिती असताना आता महावितरणकडून थकीत वीज देयकापोटी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतक-यांना वीजपुरवठ्याअभावी सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यावर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडल आहे. दुष्काळी परिस्थिती व नापिकी, शेतीमालाला भाव नाही. रब्बी हंगामावर अनिश्चिततेचे सावट यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच, आता महावितरणने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार चालविल्याचा निषेध रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाºयांनी केला. थकित देयकापोटी वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, वीज देयक माफ करावे, अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, सोयाबीनला कमीतकमी ४२०० रुपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनावर सतीश देशमुख, शिवाजी पूरी, रामा राऊत, सचिन गांजरे, गजानन पूरी, सिद्धार्थ इंगळे, अजय बाबर, बालाजी काळे, प्रवीण हागे, अक्षय क-हाळे, पंकज सोनुने, ज्ञानेश्वर सरकटे, पवन पवार, सुंदर पुरी, गोपाल मोरे, मनोज वानखेडे, प्रदीप भूतेकर, शैलेश संत्रे, विष्णू कदम, संजय मगर यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत.