वाशिम - शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाने घोषित केलेल्या आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात ११ आॅक्टोबर रोजी वाशिम येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानावर असलेल्या व त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अनुदानास पात्र असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित करून त्यांना अनुदान सूत्र लागू करावे, २४ वर्षे सेवा झालेल्या पात्र सर्व शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी लागू करावी, आॅनलाईन संच मान्यतेतील त्रुटी दूर करूनच प्रचलित निकषानुसार संच मान्यता करण्यात यावी, केंद्राप्रमाणेच शिक्षकांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा, वय वर्षे ६ ते १८ वयोगटातील सर्व मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, डी.सी.पी.एस.च्या हिशोब पावत्या त्वरीत देण्यात याव्या, सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम त्वरित खात्यात वळती करण्यात यावी, शालार्थ प्रणालीमध्ये नावे प्रलंबित असणाºया शिक्षकांना त्वरीत शालार्थमध्ये सामावून घेण्यात यावे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, वैद्यकिय प्रतिपूर्तीसाठी कॅशलेश कार्डाचे त्वरित वाटप करण्यात यावे, २०१२-१३ पासून नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्यात याव्यात, वाढीव पदांच्या वेतनाची त्वरित तरतूद करण्यात यावी, रिक्त पदावरील शिक्षक नियुक्त्या त्वरीत करण्यात याव्या, शिक्षक पाल्यांना मोफत शिक्षण या शालेय आदेशाची योग्य अर्थाने अंमलबजावणी करावी, बृृहत आराखड्यानुसार आवश्यक्यता असल्यास कनिष्ठ महाविद्यालयाला मान्यता द्यावी, स्वयंअर्थसहाय्यित मान्यता देण्यास बंद करावे, मुक्त शाळा धोरण बंद करावे, दोषपूर्ण ११ वी आॅनलाईन प्रवेश पद्धती बंद करावी, उपप्राचार्य व पर्यवेक्षकांच्या ग्रेड पे मध्ये वाढ करावी, एम.फिल, पी.एच.डी. साठी वरिष्ठ महाविद्यालया प्रमाणे लाभ द्यावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘विज्युक्टा’ या शिक्षक संघटनेने ११ आॅक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले. वाशिम जिल्ह्यातदेखील ‘विज्युक्टा’ संघटनेने धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनात ‘विज्युक्टा’चे सर्व पदाधिकारी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होते.
‘विज्युक्टा’ संघटनेचे धरणे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:08 PM