कोणत्याही इमारतीत अग्निशमन यंत्रणेची साधने आवश्यक असतात. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक फिटिंग्जही सुस्थितीत असणे आवश्यक असते. यासाठी ठराविक कालावधीनंतर इलेक्ट्रिक साधनांची तपासणी करण्याची गरजही असते. वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणकडून घरगुती आणि कृषीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या साधनांची अधूनमधून पडताळणी करून त्यांची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया राबविली जात असली तरी. त्यांच्याच अख्त्यारीतील कार्यालयांची स्थिती काय आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात धनज बु. दापुरा, शिरपूरसह काही सेक्शन कार्यालयांसह मानोरा येथील शहर कार्यालयाची स्थिती प्रामुख्याने वाईटच असताना गेल्या तीन वर्षांत या कार्यालयांचे इलेक्ट्रिक ऑडिटच झाले नसल्याचे कळले आहे. यावरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षाच धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------------
सेक्शन कार्यालय धनज बु.
कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील महावितरणच्या कार्यालय परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या तारा झाडांच्या फांद्यात छेदत असल्याचे चित्र दिसत आहे. यातून एखादवेळी वादळवाऱ्याने तारा तुटल्यास येथे अपघात घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. आतमधील तारांची जोडणीही व्यवस्थित नसून, कार्यालयामधील आसन व्यवस्था ही अगदी भिंतीलगतच असल्याने कर्मचारी सुरक्षित असल्याचे दिसत नाही.
------------
आसेगावचे कार्यालय बंदच
मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथे नव्याने नियुक्त झालेले कनिष्ठ अभियंता नियमित कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. हे कार्यालय अगदी छोटेखानी आहे. हे कार्यालय दुपारच्या सुमारास बंद आढळल्याने कार्यालयाच्या अंतर्गत भागातील इलेक्ट्रिक फिटिंगची पाहणी करणे मात्र शक्य झाले नाही. कार्यालय परिसराची स्थिती मात्र समाधानकारक असल्याचे दिसून आले.
------
कोट: महावितरणच्या कार्यालयातील इलेक्ट्रिक फिटिंग्सची स्थिती चांगली आहे. स्वत: काम करणारे कर्मचारी तज्ज्ञ असल्याने तेथे अपघाताची शक्यता कमीच असते. कुठल्या कार्यालय परिसरातील झाडांच्या फांद्या छेदत असतील, तर त्यांची पाहणी करून त्या कापून तारा मोकळ्या करण्यात येतील.
- फुलसिंग राठोड,
संपर्क अधिकारी, महावितरण वाशिम
===Photopath===
190121\19wsm_1_19012021_35.jpg
===Caption===
तारा झाडांच्या फांद्यात छेदत असल्याचे चित्र