वीजदेयक माफ करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:09 PM2020-09-11T12:09:46+5:302020-09-11T12:10:19+5:30
१० सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्यात आले.
वाशिम : लॉकडाऊनच्या कालावधीतील २०० युनिटपर्यंतचे वीजदेयक माफत करण्याचा निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, जिल्हा वाशिमतर्फे १० सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारी दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, वाढीव वीजदर मागे येऊन ३० टक्के दर कपातीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता करीत विधानसभा अधिवेशनात निर्णय घ्यावा आदी मागण्या वेळोवेळी करण्यात आल्या. ३ सप्टेंबर रोजीदेखील जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. अद्यापपर्यंत वीज देयक माफीसंदर्भात राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने आम आदमी पार्टीच्या पदाधिकाºयांनी गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. २०० युनिटपर्यंतचे वीज देयक माफ करावे यासह अनेक घोषणा यावेळी पदाधिकाºयांनी दिल्या.