वाशिम: मीटर रीडिंग उशिरा घेतल्या जात असल्याने ग्राहकांना जास्त बिल येत असल्याची एकीकडे ओरड हाेत असतांना वीज वितरण कंपनीकडून मात्र रीडिंग कधीही घेतले तरी ग्राहकांना त्याचा फटका बसत नसल्याचे सांगण्यात येत आहे.वीज वितरण कंपनीतर्फे युनिटनुसार स्लॅब पाडण्यात आले आहेत. १०० युनिटपर्यंत विजेचा वापर केल्यास काेणत्या किती रुपयाने आकारणी करावी व त्यापेक्षा जास्त वापर केल्यास काय आकारणी करावी. परंतु युनिट रीडिंग घेण्यास उशीर करीत असल्याने ग्राहकांना फटका बसत असल्याचे सर्वत्र बाेलल्या जात आहे. वेळेवर रीडिंग घेऊन ग्राहकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी आहे.
ही घ्या उदाहरणेउदाहरण १ : वाशिम येथील बंडू देवकते, रा. शुक्रवार पेठ यांच्या भाागात नेहमीच रीडिंग घेणारा दाेन-दाेन महिन्यांपर्यंत येत नसल्याने जादा बिल येत असल्याचे सांगितले.
उदाहरण २ : वीज मीटर रीडिंग घेणारा व्यक्ती मी कधीच पाहिला नाही. रीडिंग काेणत्याप्रकारे घेतल्या जाते हेही कळत नाही. याचा फटका बिलात दिसून येताे असे देवपेठ येथील गजानन पैनकर यांनी सांगितले
मिटर रिडींग उशिरा घेतल्यानंतरही ग्राहकांना याचा फटका बसत नाही. कारण महावितरण कंपनीकडून युनिटचे विभाजन केल्या जाते. एक दिवस आधी किंवा नंतरही रीडिंग घेतल्यास ३० किंवा ३१ दिवसाचे प्रत्येकी रीडिंगनुसारच बिलाची आकारणी करण्यात येते. -आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, वाशिम