वाशिम : मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "माझी कन्या भाग्यश्री" या उपक्रमाचा गजर १ मे हा महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत करण्याचा शासन आदेश महिला व बालकल्याण विभागात धडकला आहे. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात नियोजन केले जात असून, ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या.१ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेली सुकन्या योजना विलिन करून ह्यमाझी कन्या भाग्यश्रीह्ण ही नवीन योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली आहे. सदर योजना दारिद्रय रेषेखालील सर्व कुटूंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून दारिद्रय रेषेखालील एपीएल कुटूंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी या योजनेतील काही लाभ देण्यात येणार आहेत. ह्यमाझी कन्या भाग्यश्रीह्ण ही योजना राबविताना क्षेत्रीय कार्यालयांना येणाऱ्या अडचणी विचारात घेउन स्पष्टीकरणात्मक शासन परिपत्रक २२ फेब्रुवारी २०१७ रोजी निर्गमित केले आहे. ह्यमाझी कन्या भाग्यश्रीह्ण योजनेचा शासन निर्णय व शासन परिपत्रकाबाबत ग्रामस्थांना माहिती व्हावी तसेच ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी १ मे रोजी ग्रामसभेत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. १ मे २०१७ रोजीच्या ग्रामसभेत माझी कन्या योजनेच्या शासन निर्णय व शासन परिपत्रकाचे वाचन करण्याच्या सूचना शासनस्तरावरून आलेल्या असून, या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेले आहेत.
महाराष्ट्र दिनी होणार "माझी कन्या भाग्यश्री"चा गजर!
By admin | Published: April 26, 2017 8:24 PM