लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर (बुलडाणा): भरधाव ट्रकने नॅनो कारला दिलेल्या जबर धडकेत पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यानजीक ७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये अकोला येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील मोहनप्रसाद दुबे व वनविभागाचे रेंजर आॅफिसर रमेश दुबे यांचे कुटूंबीय जखमी झाले. अत्यवस्थ झालेल्या महिलेस अकोला हलविण्यात आले असून उर्वरीतांवर स्थानीय कोलते रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राधाकृष्ण प्लॉट येथील दुबे परिवारातील सदस्य मोताळा तालुक्यातील टेंभी माकोडी येथील कार्यक्रम आटोपून टाटा नॅनो कार क्र.एमएच-पी-४०६१ ने परतीच्या वाटेवर होते. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून नागपुरकडून मुंबईकडे भरधाव जाणारा ट्रक क्र.एमएच३४-ए-५३३६ कारवर आदळला. या अपघातात नॅनो चालक रमेश बिहारीलाल दुबे (वय ५८), मोहनप्रसाद बिहारीलाल दुबे (वय ५४), सौ.संगीता मोहनप्रसाद दुबे (वय ४५), अनिता रमेश दुबे (वय ५१), सौ.गिता अनिल दुबे असे पाच जण गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी अनिता दुबे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. इतरांवर डॉ.कोलते रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून तपास सपोनि साहेबराव खांडेकर करीत आहेत.
मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची नॅनोला धडक, पाच गंभिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 7:24 PM
मलकापूर (बुलडाणा): भरधाव ट्रकने नॅनो कारला दिलेल्या जबर धडकेत पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यानजीक ७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देअपघातात अकोला येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील मोहनप्रसाद दुबे व वनविभागाचे रेंजर आॅफिसर रमेश दुबे यांचे कुटूंबीय जखमी अनिता दुबे यांची प्रकृती अत्यवस्थ; उपचारार्थ अकोला येथे हलविलेउर्वरीतांवर जखामिंवर स्थानीय रुग्णालयात उपचार करण्यात आले