वाशिम लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 04:19 PM2018-10-07T16:19:13+5:302018-10-07T16:20:06+5:30
वाशिम : मुंबईत येथे राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरु असून, ७ आॅक्टोबर रोजी वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर राकॉने दावा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरु असून, ७ आॅक्टोबर रोजी वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर राकॉने दावा केला आहे. युतीत आतापर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला आहे.
लोकसभा मतदारसंघाची चाचपणी म्हणून ही महत्वपूर्ण बैठक असून, रविवारी वाशिम जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्ह्यातील राकाँची परिस्थिती मांडली. या बैठकीला राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आमदार छगन भूजबळ यांच्यासह राकाँचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.यावेळी राकॉने वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा कसा ठरणार या मुद्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. काँग्रेस, राकाँ युतीत वाशिम-यवतमाळ मतदारसंघ हा आतापर्यंत काँग्रेसकडेच राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेत राकाँचे वर्चस्व आणि एकंदरीत अन्य बाबी मांडत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्यात यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. राकाँच्या या भूमिकेला काँग्रेसचा कसा प्रतिसाद मिळतो, वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस दावा सोडणार का, हे प्रश्न तुर्तास अनुत्तरीय असून यामुळे राजकारण मात्र तापत असल्याचे दिसून येते.