बोहल्यावर चढण्यापूर्वी नवदाम्पत्याने केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:14+5:302021-07-16T04:28:14+5:30

कारखेडा येथील शंकरगिरी महाराज सभागृहात १५ जुलै रोजी लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी कारखेडा येथील वधू पूजा ...

The newlyweds planted trees before climbing Bohalya | बोहल्यावर चढण्यापूर्वी नवदाम्पत्याने केले वृक्षारोपण

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवदाम्पत्याने केले वृक्षारोपण

Next

कारखेडा येथील शंकरगिरी महाराज सभागृहात १५ जुलै रोजी लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी कारखेडा येथील वधू पूजा रमेशराव देशमुख, तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लाडकी येथील वर अंकुश छत्रपती देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात फळझाडांची लागवड करून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी लागवड अधिकारी विजय चतुरकर, उपसरपंच अनिल काजळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख,जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, शिक्षक रणजित जाधव, कविता चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मीना ढोके, गणेश जाधव, प्रमिला चव्हाण, वर्षा देशमुख, मनोज तायडे, अनुप देशमुख, बाळू जाधव, चोखला राठोड, नरेश राठोड यांची उपस्थिती होती.

------------

कन्या वनसमृद्धीअंतर्गत मातांना फळझाडांचे वाटप

सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कन्या वनसमृद्धी योजनेअंतर्गत सन २०२० ते २१ च्या कार्यकाळात ज्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला आले, अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा फळझाडे वाटप केली जात आहेत. या अंतर्गत कारखेडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात ग्रामपंचायतीकडून मातांना फळझाडांचे वाटप करण्यात आले. सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक लागवड अधिकारी विजय चतुरकर, सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.

Web Title: The newlyweds planted trees before climbing Bohalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.