कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहिचा मृत्यू; वनविभागच्या दिरंगाईमुळे प्राण गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:25 PM2019-06-07T16:25:31+5:302019-06-07T16:25:56+5:30
वाशिम : मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. गावकºयांना ही बाब कळताच त्यांनी मालेगाव वनविभागाला भ्रमणध्वनी करुनही ते वेळेवर न पोहचल्याने त्याचा जीव गेला असल्याचा आरोप शिरसाळावासियांनी केला आहे.
शिरसाळा या गावात पाण्याच्या शोधात आलेल्या रोहीवर गावातीलच काही कुत्र्यांनी हल्ला करुन जखमी केल्याचे ग्रामस्थांना कळाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही ग्रामस्थांनी मालेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, अधिकारी यांच्याशी संपर्कही साधला. तब्बल ५ तास उलटल्यानंतरही याची कोणीच दखल घेतली नाही. नागरिकांनी त्याला उचलून त्यांच्यापरिने उपचार करण्याचा प्रयत्न केला. पाच तासपर्यंत जीवंत असलेल्या रोहीवर वेळीच उपचार झाले असते तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता असे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे. यानंतर काही ग्रामस्थांनी वाशिमवनविभागाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क केला असता ती टिम ताबडतोब पोहचली परंतु कुत्र्यांनी रोहीला चांगलेच जखमी केल्याने त्याचे प्राण गेले होते. वनविभाागाच्या काही अधिकाºयांचे दुर्लक्ष, निष्काळजीपणामुळे एका वन्यप्राण्याला मात्र जीवाला मुकावे लागल्याची घटना ७ जून रोजी घडली. यासंदर्भात मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी आमचा स्टाफ होता. रोहीचा पाय तुटला होता. रोहीचे शवविच्छेदन सद्यस्थितीत शिरपूर येथे सुरु असल्याचे सांगितले. मालेगाव वनपरिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी तेथे पोहचले होते का याबाबत विचारले असता त्यांनी वनविभागाचा स्टाफ होता मालेगावचा असो की वाशिमचा याने काय फरक पडतो असे सांगितले. यावरुन शिरसाळावासियांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. याप्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करुन दोषी अधिकारी, कर्मचाºयांना जाब विचारणे गरजेचे झाले आहे.
रोही जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांन२२ी जायला पाहिजे होते परंतु त्यांची रात्रीची पेट्रोलिंग असल्याने वाशिमची टिम गेली होती. सकाळी ७ वाजता कळल्याबरोबर शिरपुटी येथील वनरक्षकास कळविले व तो ८ वाजता घटनास्थळी पोहचला होता. रोही रात्रीच्यावेळी खड्डयात पडला असावा त्यानंतर कुत्र्यांनी त्यावर हल्ला चढविला असावा, ही बाब सकाळी उघडकीस आली. वन्यप्राण्यावर हल्ला झाल्याने तो प्राणी शॉकमध्ये असल्याने मृत्यू झाला असावा. शेवटी मालेगावचे असो की वाशिमचे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थही मात्र पोहचले होते.
- सुमीत सोळंके
जिल्हा वनअधिकारी, वाशिम