‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’साठी नोडल अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:56+5:302021-04-28T04:44:56+5:30
००००० कृषी अधिकाऱ्यांनी घेतला आढावा! वाशिम : आगामी खरीप हंगाम, खते बियाणे वाटप यांसह अन्य विषयांसंबंधी जिल्हा अधीक्षक कृषी ...
०००००
कृषी अधिकाऱ्यांनी घेतला आढावा!
वाशिम : आगामी खरीप हंगाम, खते बियाणे वाटप यांसह अन्य विषयांसंबंधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी मंगळवारी कृषी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. बांधावर खते, बियाणे पोहचविण्याचे नियोजन केले जात आहे.
०००
मोबदल्यापासून शेतकरी वंचित !
वाशिम : पैनगंगा नदीवरील बॅरेजचे पाणी शेतात घुसत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही अद्यापही भरपाई मिळाली नाही. नुकसानग्रस्त जमिनीचा सर्व्हे करून भरपाई देण्याच्या मागणी शेतकऱ्यांनी मंगळवारी पाटबंधारे विभागाकडे केली.
०००
ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव
वाशिम : अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी, सुसज्ज शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी २७ एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.