घराबाहेर फिरल्याने कोरोनाबाधिताविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 05:41 PM2021-05-08T17:41:08+5:302021-05-08T17:41:16+5:30

Washim News: ब्राह्मणवाडा येथे एका व्यक्तिवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Offense against corona patient for walking out of the house | घराबाहेर फिरल्याने कोरोनाबाधिताविरूद्ध गुन्हा

घराबाहेर फिरल्याने कोरोनाबाधिताविरूद्ध गुन्हा

Next

मालेगाव : कोरोनाबाधित असूनही घराबाहेर फिरतांना आढळला म्हणून ब्राह्मणवाडा येथे एका व्यक्तिवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील ही पहिलीच घटना असून, यामुळे कोरोनाबाधित नागरिकांना वचक बसेल यात शंका नाही.

मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथिल ग्रा प सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सचिव मोहन पिराजी वानखडे यांनी मालेगांव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की गावातील एका कोरोनाबाधिताला गृहविलगिकरणात राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र ते घरात न राहता गावतील बाबाराव सारंग गुट्टे यांच्या सोबत ५२ पत्ते खेळत असताना आढळले. कोरोना संक्रमित असूनही बाहेर फिरून कोरोना प्रसार करत असल्यामुळे त्यांच्यावर मालेगांव पोलीस स्टेशन मध्ये भादंवी १९८६ अंतर्गत कलम १८८ व २६९,२७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वतः कोरोना संक्रमित असताना बाहेर फिरणे म्हणजे दुसऱ्याला जीव धोक्यात घालने आहे, हा एक प्रकारचा मोठा अपराध असून यापुढेही कोरोनासंक्रमित बाहेर पडले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Offense against corona patient for walking out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.