मालेगाव : कोरोनाबाधित असूनही घराबाहेर फिरतांना आढळला म्हणून ब्राह्मणवाडा येथे एका व्यक्तिवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील ही पहिलीच घटना असून, यामुळे कोरोनाबाधित नागरिकांना वचक बसेल यात शंका नाही.
मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथिल ग्रा प सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सचिव मोहन पिराजी वानखडे यांनी मालेगांव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की गावातील एका कोरोनाबाधिताला गृहविलगिकरणात राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र ते घरात न राहता गावतील बाबाराव सारंग गुट्टे यांच्या सोबत ५२ पत्ते खेळत असताना आढळले. कोरोना संक्रमित असूनही बाहेर फिरून कोरोना प्रसार करत असल्यामुळे त्यांच्यावर मालेगांव पोलीस स्टेशन मध्ये भादंवी १९८६ अंतर्गत कलम १८८ व २६९,२७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वतः कोरोना संक्रमित असताना बाहेर फिरणे म्हणजे दुसऱ्याला जीव धोक्यात घालने आहे, हा एक प्रकारचा मोठा अपराध असून यापुढेही कोरोनासंक्रमित बाहेर पडले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली जात आहे.