लोकमत न्युज नेटवर्कधनज बु. (वाशिम) : कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येथून जवळच असलेल्या भिवरी येथे शंभर चौरस मिटरचे साठवण तळे खोदण्यात येत आहे. या शेततळ्याचे खोदकाम आठ फुटापर्यंत पूर्ण झाले असून, पुढील पावसाळ्यात या शेततळ्यामुळे भुजल पातळी सुधारण्यास मोठा आधार होण्यासह शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.कारंजा तालुक्यातील भिवरी येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शंभर चौरस मिटर आकार आणि तीन मोट खोलीच्या साठवण तळ्यास मंजुरी मिळाली होती. पावसाळ्यात उशिरापर्यंत पाऊस पडत असल्याने आणि जमिनीत ओल असल्याने या शेततळ्याचे काम थांबले होते. जमिनीतील ओलावा कमी झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून या शेततळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली; परंतु आठ फू ट खोल खोदकाम झाल्यानंतर पाणी लागल्याने हे काम आता थांबविण्यात आले आहे. पुन्हा पाणी पातळी खाली गेल्यानंतर या साठवण तळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहाय्यकांनी दिली. या शेततळ्यात परिसरातील ६० ते ७० हेक्टर क्षेत्रात पडणाºया पावसाचे पाणी जमा होऊन २६ टीसीएम जलसाठा होणार आहे. त्यामुळे परिसरातील १५ पेक्षा अधिक विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहेच शिवाय शेतकºयांनाही या साठवण तळ्यातील पाण्याचा सिंचनासाठी आधार होईल आणि गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही मिटणार आहे.
परिसरातील नाल्याद्वारे वाहून जाणाºया पाण्याची साठवणूक करण्यासाठी हे साठवण तहे तयार करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना सिंचनासाठी आधार होणार आहे.-प्रविण किर्दक,कृषी सहाय्यक, धनज बु.