लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : स्मशानात जळत असलेल्या चितेवरील ठिणगी उडाल्याने लागलेल्या आगीमुळे शेजारच्या शेतांमध्ये शेतकर्यांनी जमा करून ठेवलेले शंभर गाड्या सोयाबीन कुटार जळून खाक झाले. ही घटना शनिवारी ४ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे घडली. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील स्मशानभूमीत जळत असलेल्या चितेवरील एक ठिणगी उडून स्मशानभूमीनजिक असलेल्या शेतशिवारातील एका वाळलेल्या झाडावर पडली. त्यामुळे या झाडाने लगेचच पेट घेतला. त्यातच जोराचा वारा सुटल्याने पेटलेल्या झाडाची पाने उडूने गावाच्या शेजारी शेतकर्यांनी आपल्या शेतात जमा केलेले इंधन, शेणखत, सोयाबीनच्या कुटारावर पडली आणि लगेचच गावाबाहेर आगीचे तांडाव सुरु झाले. आगीची भीषणता लक्षात घेऊन गावकर्यांनी आग विझविण्याच्या प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात येत नसल्याने व गावाला आगीपासून असलेला धोका पाहता कारंजा, मंगरुळपीर व मूर्तिजापूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलाविण्यात आल्या. त्यानंतर आग सायंकाळी ७.३0 वाजता आटोक्यात आली. दरम्यान, गावकर्यांनी घटनास्थळी पोहोचून विहिरीतील पाणी हाताने ओढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळ ताच कामरगाव चौकीचे पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे, जमादार राजगुरे, राहुल वानखडे, पो.काँ. टाले घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्यास मदत केली.मान्सूनपूर्व पावसाचीही कृपा कामरगावातील आगीचे तांडव व वादळी वार्याचा जोर वाढत असताना आग वाढत होती. त्यामुळे गावातील लोकांची मदत तोकडी पडत असताना कारंजा येथील अग्निशमन दलाची तुकडी घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आग विझविण्यास सुरुवात करताच वरुण राजाची रोहिणी नक्षत्रातील मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे झाले.
आगीमध्ये शंभर गाड्या कुटार खाक
By admin | Published: May 28, 2017 4:02 AM