लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लिंबू या फळपिकासाठी विमा उतरविण्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत शिल्लक असून, १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी शुक्रवारी केले.लिंबूसाठी वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर या महसूल मंडळाचा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ६० हजार रुपये आहे. याकरिता एकूण विमा हप्ता ३३१९२ रुपये आहे, यापैकी शेतकºयांना केवळ ३ हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे असून उर्वरित विमा हप्ता शासन भरणार आहे. लिंबू पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे.संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा, राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहांगीर, रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस, मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलूबाजार, पोटी, कवठळ, धानोरा, पाडीर्ताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी बु. कुपटा तसेच कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कामरगाव, धनज बु. पोहा, खेर्डा, हिवरा लाहे, येवता या महसूल मंडळांचा समावेश विमा योजनेत करण्यात आला आहे. संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे. आंबा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.
‘लिंबू’साठी विमा उतरविण्याकरिता केवळ चार दिवस शिल्लक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:16 PM
वाशिम : लिंबू या फळपिकासाठी विमा उतरविण्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत शिल्लक असून, १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी शुक्रवारी केले.
ठळक मुद्देफळपिक विमा योजना सहभागी होण्याचे आवाहन