लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम) : मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाºया पार्डी ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गातील १०८ विद्यार्थ्यांना केवळ तीन शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही या ठिकाणी नव्या शिक्षकाची नियुक्ती करण्याची तसदी घेतली जात नाही. पार्डी ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. या ठिकाणी परिसरातील १०८ विद्यार्थी शिक्षणही घेत आहेत. पटसंख्येनुसार या ठिकाणी किमान चार शिक्षकांची आवश्यकता असून, आॅगस्ट २०१८ पर्यंत एवढेच शिक्षक या ठिकाणी कार्यरत होते; परंतु आॅगस्ट महिन्यात मुख्याध्यापक वानखडे सेवानिवृत्त झाल्याने येथील एका शिक्षकाचे पद रिक्त झाले. त्यानंतर येथे नव्या शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक होते; परंतु तीन महिने उलटले तरी, येथे नव्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसून, केवळ तीनच शिक्षक १०८ विद्यार्थ्यांना ज्ञानदानासह शाळेचे कामकाज करीत आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे. येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गाकडून शिक्षकाचे रिक्त पद भरण्याची मागणीही करण्यात आली; परंतु त्याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे मुख्यकार्यकारी अधिकाºयांना निवेदनपार्डी ताड येथील जिल्हा परिष प्राथमिक मराठी शाळेत एका शिक्षकाचे पद रिक्त असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही या ठिकाणी शिक्षकाचे पद भरण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे येथील शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे २९ डिसेंबर रोजी निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन लांभाडे, श्रीकृ ष्ण मेरकर, मंदा पानभरे, दत्ता ठाकरे, दूर्गा डाळ, बाळू भगत, सुजाता भगत, राजू टोंचर, दत्ता पानभरे, खंडुजी लांभाडे, मुरलीधर माचलकर, अशोक लांभाडे यांच्यासह अनेक पालकांची स्वाक्षरी आहे.
जि.प. शाळेतील १०८ विद्यार्थ्यांसाठी केवळ तीन शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 3:41 PM